लॉकडाऊनच्या निर्णयाला व्यावसायिकांनी तीव्र विरोध दर्शविला |Lockdown | Suresh Dhas| Sakal Media |
  • 3 years ago
आष्टी - बीड जिल्ह्यात उद्यापासून (ता. २६) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला आष्टीतील व्यावसायिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने आमदार सुरेश धस यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यानंतर आमदार धस यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन सविनय कायदेभंगाची हाक देण्यात आली. त्यानुसार व्यापाऱ्यांनी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण लॉकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. बीड जिल्ह्यात गुरुवारी (ता. २६) मध्यरात्री बारापासून ता. ४ एप्रिल असा दहा दिवसांचा लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
#SureshDhas #Lockdown #Beed
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended