कामगार राज्यमंत्री बच्चू कडू वीटभट्टी कामगारांच्या दारी | Amravati | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाव्दारे कामगारांसाठी १९ प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. लोकांची घरे निर्माण होत असताना वीट भट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली वीट बांधकामासाठी प्रथमत: उपयोगात येते. अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे. कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करून त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. कामगारांच्या सुख-समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended