कऱ्हाडमधील जुन्या कोयना पुलाची तपासणी सुरु | Karad | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
कऱ्हाड - येथील जुन्या कोयना पुलावरुन किती क्षमतेची वाहने जावु शकतात याची तपासणी रविवारी (ता.24) सायंकाळपासून सुरु
झाली. त्यासाठी मुंबईहुन वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे प्रा. अभय बांबोले यांच्यासह कऱ्हाडच्या इंजिनीयरींग कॉलेजचे पथक
दाखल झाले आहे. संबंधित पुलावर लोडचे डंपर लावुन पुलाच्या क्षमतेची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पुलाच्या खाली अत्याधुनिक वजन मापक यंत्रणा बसवली आहे. त्याव्दारे 24 तास दर तासांच्या वजनाच्या नोंदी घेतल्या जातील अशी माहिती ए. जे. हुद्दार (सहायक अभियंता, बांधकाम विभाग, कऱ्हाड) यांनी दिली.
Video - हेमंत पवार
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended