टार्गेट २०२१ : टार्गेटवर हीट करण्यासाठी मी सज्ज : पूर्वशा शेंडे | Amravati | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
मागील १२ वर्षांपासून सातत्याने विविध स्पर्धा गाजविणा-या अमरावतीच्या पूर्वशा सुधीर शेंडे हिने आगामी स्पर्धेतसुद्धा आपल्या विजयाची मालिका कायम राखण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. कोरोनाच्या काळात मैदानावरील सरावात खंड पडला असला तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. वडील सुधीर शेंडे यांची मिळालेली साथ पूर्वशाला प्रचंड बळ देणारी ठरली. कोरोनाच्या काळात मानसिकदृष्ट्या स्वतःला कणखर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. यंदा स्पर्धा झाली नसली तरी येणा-या स्पर्धेसाठी माझी तयारी सुरू आहे. त्यामुळे टार्गेटवर हीट करण्यासाठी मी सज्ज असल्याचे पूर्वशा शेंडे हिने सांगितले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended