नियोजन व परिश्रमातून फुलविली बटाट्याची शेती | Farm | Farmer | Sakal | Sakal Media |
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांना फाटा देत हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा येथील प्रमोद कृष्णराव फुलकर या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून बटाट्याची शेती फुलविली आहे. दीड एकरातील शेतीमध्ये फुलकर यांनी केलेल्या नियोजन आणि परिश्रमाला आता उन्नतीचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. पिकाला सध्या एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून जवळपास २ ते ३ महिन्यांनी पीक काढणीवर येणार आहे. दीड एकरात लावलेल्या बटाट्याचे त्यांना दोन ते सव्वा दोन लाख रुपयाचा निव्वळ नफा होण्याचा अंदाज आहे. पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता फुलकर यांनी पीक बदल केला. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended