शिर्डी येथील फलक हटविणारचं: तृप्ती देसाई; शिर्डीला रवाना | Shirdi | Trupti Desai | Sakal Media
  • 3 years ago
पुणे : ''शिर्डी संस्थानने महिलांच्या कपड्यांबाबत लावलेला बोर्ड काढून घ्यावा नाहीतर आम्ही जाऊन काढू'' अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली असून त्या आज सकाळी शिर्डीकडे रवाना झाल्या आहेत. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या महिलांना घेऊन नगरमार्ग शिर्डीच्या दिशेने रवाना झालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिस अडवणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.  शिर्डी येथील साई बाबा संस्थांनाने मंदिरात येणाऱ्या महिलांनी तोकडे कपडे घालून येऊ नये भारतीय पोषाखात यावे,अशी विंनती साईभक्तांना केली आहे. तसे फलक देखील मंदिर परिसरात लावेल आहे. यावरुन वाद निर्माण झालेला असून साई संस्थांच्या या निर्णयाचे काहींनी समर्थन केले आहे तर भुमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी विरोध केले. संस्थानाने फलक न हटविल्यास आम्ही हटवू  असा इशारा दिला होता तसे पत्र देखील पाठवले होते. त्यांनतरही फलक न हटविले नाही. त्यामुळे आज शिर्डीत जाऊन बोर्ड हटवण्याच्या इराद्याने देसाई  निघाल्या आहेत. त्यामुळे शिर्डी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिराची पाहणी अॅडीशनल एस पी दिपाली काळे यांनी केली आहे.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended