संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधी दिनानिमित्त कार्तिकी वारीचा पालखी सोहळा Pune | Sakal |
  • 3 years ago
आळंदी,ता.८ ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजिवन समाधीदिननिमित्त कार्तिकी वारीस कार्तीक वद्य अष्टमीला(ता.८) पालखी सोहळा. मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनान सुरूवात झाली.
टाळ मृदंगाचा निनाद अन माउली नामाच्या गजरात अवघा देवुळवाडा न्हाउन निघाला.
दरम्यान कार्तिक वद्य एकादशी(ता.११) आणि माऊलीचा संजिवन समाधीदिन कार्तिकी वद्य त्रयोदशीला(ता.१३)होणार आहे.
संपूर्ण वारीवर कोरोनाचे सावट असल्याने राज्य सरकारने संचारबंदी केली.परिणामी अल्प वारक-यांच्या उपस्थीतीत सोशल डिस्टनन्सिंगचे नियम पाळून वारुला सुरुवात झाली.आज पहाटे माउललींच्या समाधीवर पवमानपुजा झाली.त्यानंतर कार्तिक वद्य अष्टमी असल्याने सकाळी नउच्या दरम्यान गुरू हैबतबाबांच्या पायरी पुजनाची तयारी सुरु झाली. श्रिनिवास कुलकर्णी अमोल गांधी ब्रम्हवृंदांनी केलेल्या मंत्रोच्चारात हैबतबाबांच्या पायरी पुजन आणि वारकरी भजनाने देवुळवाडा माउलीमय झाला. यावेळी हैबतबाबांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर,देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक,अॅड विकास ढगे, योगेश देसाई,राजाभाउ आरफळकर,राजाभाउ चोपदार,पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे,डी डी भोसले,राहुल चिताळकर,अजित वडगावकर यांची उपस्थिती होती.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended