मराठा समाजाला ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार :संभाजी ब्रिगेड| Sakal Media |
  • 3 years ago
राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा संघटनांमध्येच वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झालीत कारण संभाजी ब्रिगेड आता मराठा समाजाला ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे, मराठा समाजाला ईडब्लूएस चं आरक्षण द्यावं, कारण लाखो विद्यार्थ्यांच भविष्य आरक्षण नसल्यानं अंधारात जाऊ शकतं, त्यामुळे एस ईबीसीचा निकाल लागण्याआधी मराठा समाजाला ईडब्लूएसचं आरक्षण द्यावं अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतलीये, एस ईबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही, फडणवीस सरकारने एस ईबीसीची आशा दाखवून मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही आरोप त्यांनी केलाय आठ दिवसात ईडब्लूएसचं प्रमाणपत्र देण्याचे आदेश तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांना देण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended