विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत- सुप्रिया सुळे | Supriya Sule | | Sakal Media |
  • 3 years ago
बारामती, ता. 1- सरकार पडणार...या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असल्याने त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गेल्या वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलेले आहे. कोविड, अतिवृष्टी या सारख्या अडचणी व संकटावर सरकारने यशस्वी मात केल्याची पावती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.
#Supriyasule #BJP #Mahaaghadi #Maharashtra #Politics #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended