संजय राऊत यांनी आत्मविश्वास गमावला, प्रवीण दरेकरांचा टोला | Sanjay Raut | Sakal Media |

  • 3 years ago
खासदार संजय राऊत यांचा आत्मविश्वास गमावला आहे. त्यांच्या बोलण्यात पूर्वी इतका विश्वास दिसत नाही. मुंबईकर ठरवतील सत्तेचा झेंडा कोणाकडे द्यायाचा? त्यामुळे मुंबई महापालिकेवर आमचाच भगवा असेल, याचे कोणाकडे पेटंट नाही.'' अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

''भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. असा विश्वास दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले की, ''राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही. कॉलेज बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.''

''भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊ'' असे आश्वासन दिले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended