सुटीच्या काळात विद्यार्थ्यांच्या चित्रांनी सजली वाकडमधील पलाश हाउसिंग सोसायटी | Sakal Media |

  • 3 years ago
पिंपरी : लॉकडाउनमध्ये शहरातील सर्व शाळा बंद होत्या. अद्यापही बंदच आहेत. पण, या दीर्घ सुटीच्या काळात पहिलीतील विद्यार्थी असो की दहावी-बारावीतील त्यांनी शिक्षनाचे ऑनलाइन धडे घेतले. तरीही बराचसा वेळ हाती असायचा. मग, या राहिलेल्या वेळात करायचे काय? असा प्रश्‍न समोर होताच. त्यातून मार्ग काढण्यासाठी व मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी वाकड येथील पलाश को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटीतील स्वाती कोरडे यांनी सोसायटीतील मुलांसमोर सुटीच्या काळात चित्र रंगविण्याची संकल्पना मांडली. मुलांसह पालकांनीही त्यांना प्रतिसाद दिला. आणि सुरू झाला रंगसंगती आणि कुंचल्यांचा खेळ. यामध्ये पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्र रंगवण्यासाठी सोसायटीमधील सदनिकांमध्ये केलेल्या फर्निचरच्या कामातून उरलेले व भंगारमध्ये टाकले गेलेले, प्लायउडचे तुकडे उपयोगात आणले. ऍक्रिलिक रंगांचा चित्र रंगविण्यासाठी उपयोग केला. निसर्गचित्र, संकल्पचित्र, प्राणी, पक्ष्यांची चित्रे रंगवली गेली. साधारणतः 31 चित्रे रंगवून झाली असून ती सोसायटीच्या आवारात प्रत्येक विंगच्या प्रवेशद्वारावर, बैठकीसाठी केलेल्या कट्ट्यांच्या परिसरात लावण्यात आली आहेत. त्यामुळे सोसायटीला एक वेगळा "लूक' आला असून सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून आपल्या चित्रांचे कौतुक होत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या आनंदातही भर पडत आहे. अजूनही ऑनलाइन अभ्यास सांभाळून फावल्या वेळात चित्र रंगवण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद...
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended