लागवडीचा खर्च निघणार नसल्याने शेतकरी चिंतातूर | Live Marathi News | ताज्या बातम्या | Sakal Media |

  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : गुरुवारी बाजार समितीच्या बाजाराच्या दिवशी सकाळ प्रतिनिधीने काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता केशव विठोबा म्हैसकर (रा. पाहमी) या ज्येष्ठ शेतकऱ्यांची सहा एकर ठेक्याची शेत जमीन आहे. त्यात त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. त्यांच्या हाती पाच पोती सोयाबीन आले. तेही काळे पडलेले व दर्जाहीन. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी ही अंधारमय होणार असल्याचे एकंदरीत परिस्थितीतू दिसते. आपली व्यथा सांगताना ते भावूक झाले. ‘अजी मी दरवर्षी ठेक्याचे वावर करतो. पण, यंदा लावलागवडीचा खर्चही निघणार नाही. वाट्याले कर्ज आले आहे जी. मायबाप सरकार काही मदत करेल तर उपकार होईल’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended