गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप | Marathi News | मराठी बातम्या |
  • 3 years ago
गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर) - कोरोनाच्या संकटकाळात एका गरीब कुटुंबातील एकोणवीस वर्षीय तरूणाला गोड बातमी मिळाली. बातमी होती भारतीय सैन्यात निवड झाल्याची. चंद्रमोळी झोपडीत कसंबसं संसाराचं रहाटगाडगं चालवणाऱ्या आईवडिलांना या माहितीनं अक्षरशः भरून आलं. गावच्या गल्लीत आपणासोबत खेळणारा मित्र सैनिक होतोय, या भावनेन अतिआनंदी झालेल्या गावातील तरूणांनी वाजतगाजत फटाके फोडून ढोलताशाच्या गजरात त्याला निरोप दिला. हा प्रसंग बघतांना उपस्थितांचे डोळे आपसूचक पाणावले.
(व्हिडिओ : संदीप रायपुरे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended