Pune Rain Updates : मुसळधार पावासाने पुण्याला झोडपले! 'अशी' आहे आजची स्थिती | Sakal Media |
  • 3 years ago
Pune Rain Updates : मुसळधार पावासाने पुण्याला झोडपले! 'अशी' आहे आजची स्थिती
पुणे : शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल 40 पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच 5 ते 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. शहरात बुधवारी सायंकाळी शहरात पावसाळा सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने रस्ते पाण्याने भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी सोसायटयाचे तळघर, घरे व पार्किंगमध्ये शिरले. त्यामध्ये नागरीकांच्या गाड्या पाण्यात गेल्या.
कात्रजच्या तलाव, आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या टांगेवाला कॉलनी, गुरु राज सोसायटी, टेझर पार्क, घोरपडीमधील फैलावाली चाळ आणि परिसरातील आजच्या स्थितीचा सकाळ ने घेतलेला आढावा.
#SakalMedia #Sakal #PuneRain #Rain #HeavyRain #MaharashtraRain

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended