आज काय विशेष: नक्की कॉमेडी करतय कोण? । पुछता हैं भारत। The Kapil Sharma Show | Arnab Goswami | Sakal
  • 3 years ago
कॉमेडीसाठी प्रसिद्ध असणारा कपिल शर्मा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. रविवारी प्रसारित झालेल्या एका एपिसोडमुळे एकीकडे कपिल शर्मा शोला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसादही मिळाला आणि दुसऱ्या बाजूला टीकेची झोडही उठत आहे. त्यामुळे #TheKapilSharmaShow आणि #BoycottKapilSharmaShow हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंग आहेत. का? तर रविवारी कपिल शर्मा शोमध्ये किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक या जोडीने अर्णब गोस्वामी यांच्यावर आणि सध्याच्या एकूण पत्रकारितेच्या ओंगळवाण्या पद्धतीवर केलेलं भाष्य. आपल्या हजरजबाबी विनोदासाठी कपिल शर्मा प्रसिद्ध आहे. त्याच्याबाबत याआधीही अनेक वाद घडले आहेत आणि तसा तो याआधीही अनेक कारणाने चर्चेत राहिला आहे. मात्र यावेळचे कारण वेगळं आहे, कारण यावेळचा प्रश्न जरा गंभीर आहे कि, नक्की कॉमेडी करतंय तरी कोण? हेच कारण आज आपण समजून घेणार आहोत आज काय विशेषमध्ये
#TheKapilSharmaShow #PuchtaHaiBharat #ArnabGoswami #Journalism #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended