तर कपल ऐवजी खपल चॅलेंज होईल,'कपल चॅलेंज'वाल्यांना सायबर पोलिसांचा इशारा | Sakal Media |
  • 3 years ago
सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल याचा नेम नाही.मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय.फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नीचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोज मधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या 'कपल चॅलेंज'ने भलताच धुमाकूळ घातलाय.मात्र सोशल मीडियावर टाकलेले फोटो चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर यातून फसवणूक होऊ शकते.अशा प्रकारचे कुठलेही चॅलेंज स्वीकारताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा पुणे सायबर पोलिसांनी ट्विटरद्वारे दिला आहे. कपल चॅलेंजवाल्यांना क्रिमिनलने चॅलेंज केले तर कपल चॅलेंजचे खपल चॅलेंज होईल.त्यामुळे सोशल मीडियावरील कुठलीही चॅलेंज स्वीकारण्याआधी विचार करा असे आवाहन पोलिसांनी या ट्विटच्या माध्यमातून केले.आपण सोसियल मिडियावर टाकलेल्या फोटोमुळे त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.याअगोदर फोटो मॉर्फ करून त्याचा गैरवापर झाल्याच समोर आलं आहे.त्यामुळे असे फोटो ठेवू नका अस आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

बाईट - जयराम पायगुडे,पोलीस निरीक्षक सायबर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended