'या' गावाचा भुगर्भात दडलीय 24 मंदीरे...! | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
निलेश झाडे /धाबा : इतिहासाचा अनेक रंजक कथा भुगर्भात दफन आहेत.भुगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानश्या गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्याचे माहेरघर वाटणार हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन बाजारपेठ होतं.त्याचा खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दूसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा भुगर्भात तब्बल 24 मंदीरे दफन आहेत.गावाला लागुनच असलेल्या तलावाचा पाळीवर असलेल्या छोट्याखाणी मंदीर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवल्या गेली आहेत.शेतात नांगरतांना,घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प,खेळण्या सापडतात.बहामणी सल्तनतची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत.येथे सापडलेल्या शिल्पाचा बनावटीवरून ते चालुक्य,परमार,नाग,गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे.असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होतं हे ठोसपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.
#Chandrapur #Tree #Temple ##Art

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended