बैलांच्या रंगबेरंगी प्रतिकृतींनी सजली बाजारपेठ | Latest Marathi News | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : श्रावण महिन्यात येणारा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ग्रामीण भागात मोठ्या आनंदाने व उत्साहाने शेतकरी वर्गात हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांचे खांदे शेकण्याची प्रथा आहे. त्यासोबतच शेतकरी व सर्वसामान्य लोक मातीच्या बैलांची देखील पूजा करतात. घरातील देव्हाऱ्यात बैलांना ठेवून जी पूजा केली जाते तिला ‘वाढ बैल' पूजा म्हणून ओळखले जाते. पूजा करताना बैलांचे खांदे शेकत असताना ‘आज आवतन घे अन् उद्या जेवाले ये' असे म्हटले जाते. त्याच वाढ बैलांच्या मूर्ती विक्रीसाठी स्थानिक कुंभार बांधवांनी रस्ता दुभाजकावर रंगबेरंगी दुकाने उभारली होती.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended