अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोड ठरतोय जीवघेणा | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : गुमगाव-हिंगणा मार्गावरून जाणारा अमरावती-जबलपूर आऊटर रिंगरोड मार्गावर जागोजागी सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम, सुसाट धावणारी वाहने, वाढलेली रहदारी, वाहनधारकांची घाई, निष्काळजीपणा आणि पावसामुळे रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांना आलेले डबक्यांचे स्वरूप अशा विविध कारणांमुळे दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. कित्येकदा दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होऊन कित्येक निष्पापांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. या मार्गावरून जाणारी जडवाहतूक बघून कोणीही घाबरल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने भविष्यामध्ये होणाऱ्या अपघातांची वाट न बघता सध्या सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
(व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended