कशी केली जाते भात शेती पहा संपूर्ण व्हिडीओ...

  • 3 years ago
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात आदिवासी बहुल आहे. या भागात आदिवासी शेतकरी तुकड्या तुकड्याची शेती करून त्यात भात लागवड करतो तेही सेंद्रिय पद्धतीने, त्यासाठी पाऊस वादळ याचा सामना करत तो कष्टाने शेती करतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने भात लागवडीच्या कामाने वेग घेतला आहे. पाऊस येतो. ताल धरतो. ओढे नाले वाहू लागतात. भात खाचरं तुडुंब होतात. मेघ बरसू लागले की भंडारदरा परिसरातल्या डोंगर उताराच्या खाचरांमध्ये चिखलणी आणि आवणीची लगबग सुरू होते. भाताची रोपं तयार झालेली असतात. भाताच्या रोपांची जुड असते तिला मुठ म्हणतात. अलीकडे आदिवासी शेतकरी अत्यंत आधुनिक तंत्राने आवणी, भातशेती करत आहेत. पाऊस कोसळतोय, फुटभर चिखल आहे, गारठा असतो जोडीला. चिखलात उतरून आवणी करताना अनुभव घेतला. हे किती कष्टाचे काम आहे हेही कळलं. दिवसभर आवणी करताना कंबरडं मोडून जातं.

#sakalmedia #viral #sakalnews #nagar #marathinews #treding #sakal

Recommended