कोरोनाच्या सावटात झुंबा, योग, प्राणायाम देते मानसिक बळ

  • 3 years ago
यवतमाळ : कोरोनाच्या धाकाने घरून बाहेर पडता येत नाही. घरातल्या घरात मानसिक ताण वाढतो. हा ताण कमी करण्यासाठी चारचौघी एकत्र आल्या आणि त्यांनी सोशल डिस्टनसिंग पाळून झुंबा, योग, प्राणायाम करायचे ठरविले. जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्या खडसे, दीपाली गेडाम यांनी संदीप मंगलममध्ये दररोज सकाळी हे योगा वर्ग सुरू केले आहे. परिसरातील महिला या योगा वर्गात सहभागी होत आहे. त्यांना याचा चांगला फायदा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Recommended