रेशनच्या तांदूळसाठी रेल्वे आली धाऊन

  • 3 years ago
लॉक डाऊनच्या काळात सुद्धा रेशनच्या दुकानापर्यंत तांदूळ पोहोचविण्याचे काम रेल्वे मालवाहतुकीच्या माध्यमातून होत आहे. लॉक डाऊन च्याकाळात तांदूळ, खत आणि सिमेंटचा पुरवठा रेल्वे माल वाहतुकीतून झाला आहे. कोल्हापुरातील रेल्वे गुड्स चे पर्यवेक्षक लीलाधर मिश्राम यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितले, की उत्तर प्रदेशातून तांदूळ तर गुजरात मधून खताची आवक झाली आहे. केवळ एक चतुर्थांश हमाल असल्याने एक रेक उतरवून घेण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात.

व्हिडिओ : सुयोग घाटगे
रिपोर्टर : लुमाकांत नलवडे

#Sakal #SakalNews #SakalMedia #Kolhapur #news

Recommended