पुढील चार आठवडे बिकट, नियम पालनाचे शासनाचे आवाहन
  • 3 years ago
देशात करोनाची स्थिती अत्यंत बिकट बनू लागली असून पहिल्या लाटेपेक्षा यावेळी रुग्णांची संख्या तुलनेत खूप वेगाने वाढत आहे. रग्णवाढीचा वेग ही चिंताजनक बाब असून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पुढील चार आठवडे अत्यंत कळीचे आहेत, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिला. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात अजूनही रुग्णसंख्या आणि मृत्यू कमी असले तरी ते अधिक वाढू नयेत यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘मोहीम’ म्हणून करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पॉल यांनी केले.

#india #COVIDー19 #vaccine #lockdown