८ महिन्याच्या वेदिकाचा जगण्याशी संघर्ष ;लोकांना मदतीचे आवाहन.

  • 3 years ago
भोसरी : येथील सौरभ शिंदे कुटुंबीयांच्या घरात आठ महिन्यांपूर्वी वेदिका नावाच्या कन्यारत्नाने जन्म घेतला. मात्र, वेदिकाला मान हलवता येत नव्हती आणि इतर मुलांप्रमाणे शरीराची हालचाल करता येत नाही. डॅाक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शिंदे कुटुंबियांनी तिच्यासाठी फिजिओथेरपी सुरू केली. याचा थोडाफार फायदा झाला. मात्र, वेदिकाला होणाऱ्या त्रासापासून तिची काही मुक्तता झाली नाही. तेव्हा वेदिकाचा चेन्नईवरून आलेल्या अहवालात तिला 'स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी' हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. या आजारातून बरे होण्यासाठी तिला झोलगेस्मा या इंजेक्शनची गरज आहे. मात्र हे इंजेक्शन अमेरिकेतून आणण्यासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने शिंदे कुटुंबियांची समस्या वाढली आहे. मुलीला जगविण्यासाठी शिंदे कुटुंबियांनी मिलाप क्राऊड फंडिंग संकेतस्थळाच्या माध्यमातून निधी जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. दानशूर संस्था, व्यक्तींनी वेदिकाला वाचविण्यासाठी निधी जमा करण्याचे आवाहनही शिंदे कुटुंबियांनी केले आहे.

Recommended