#Filmyfriday: 'The Girl On The Train' पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे | Entertainment ​| Sakal Media |
  • 3 years ago
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला द गर्ल ऑन द ट्रेन चित्रपट सुरुवातीचा काही काळ उत्कंठा वाढवतो. नंतर त्या कथेची मांडणी इतकी अशक्त झाली आहे की त्यामुळे नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हे कळत नाही. या चित्रपटात परिणीती चोप्रा, अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी, अश्विनी तिवारी, तोता रॉय चौधरी यांच्या भूमिका आहेत. मीराला अॅम्नेशियाचा आजार आहे. असे सांगितले जाते. ती साध्या साध्या गोष्टी विसरते. त्यामुळे तिच्या नव-याला शेखरला ( अविनाश तिवारी) तिचा राग आहे. दुसरीकडे मीरा ज्या ट्रेननं प्रवास करते त्यावेळी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात. अर्थात तो तिचा भास आहे की त्या ख-या आहेत. हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
#filmyfriday #parineetichopra #sakalmedia #netflix
Recommended