मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्राण वेचलेल्या हुतात्म्यांचं स्मारक | गोष्ट मुंबईची: भाग ४६

  • 3 years ago
मुंबईतील फोर्ट भागात हुतात्मा चौकात जे स्मारक आहे, ते बऱ्याच जणांना वाटतं स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहे. पण हे स्मारक आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आंदोलन केलेल्या १०६ हुतात्म्यांना मानवंदना म्हणून. प्रखर आंदोलनानंतर प्रथम आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, केरळ अशी राज्ये निर्माण होण्यास सुरूवात झाली. पण मुंबईचं घोंगडं भिजत होतं. तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या धुरिणांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वामध्ये अभुतपूर्व लढा दिला व अखेर १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी १०६ जणांनी आपल्या जीवाची आहुती दिली. हुतात्मा स्मारकाचा हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

Recommended