रत्नागिरी | दापोली कोकण कृषी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस अंबेनळी घाटातून बाहेर काढली

  • 6 years ago
दोन महिन्यापूर्वी अंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून बाहेर काढली आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर बस दरीतून बाहेर काढण्यात आली. या कामासाठी महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज आठ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दापोली कृषी विद्यापीठाची बस 28 जुलै 2018 रोजी आंबेनळी घाटातील 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली होती. या बसमधील विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच मृत पावले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. या बसची तपासणी केल्यावर कदाचित या अपघाताचं तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे.